Suchita Tarde
Artist: Suchita Tarde.
या सुंदर चित्रातले आकारांतले वेगळेपण पाहत राहिले तरी आपण बराच वेळ हे चित्र पाहू शकतो. कोणता आकार कुठे ठेवला आहे आणि त्यामुळे एकूण चित्रावर त्याचा काय परिणाम झाला आहे हे पाहणं मोठं रंजक आहे. नंतर येतो तो भाग म्हणजे त्या विशिष्ट आकाराला दिलेली विशिष्ट रंगछटा. त्यातल्या नेमकेपणामुळे चित्राला एक बांधेसूदपणा प्राप्त झाला आहे. चित्रात लाल रंग वापरणं हे नेहमी एक आव्हान असतं, पण सुचिता ताईंनी या चित्रात लाल रंग इतका छान खेळवला आहे की वाह..!

Comments
Post a Comment