Vikram Kulkarni

 


चित्रकार: विक्रम कुलकर्णी. 

माझ्या आवडत्या चित्रकारांपैकी एक. कलाकार, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि त्याची कला हे अनेकदा अगदी अभिन्न होऊन जातं. काही कलाकार कलेत वेगळे दिसतात आणि व्यक्ती म्हणून वेगळे असतात. पण जो कलाकार अगदी नैसर्गिक सहजतेने कलेशी एकरूप होतो त्यामध्ये त्याचं व्यक्तित्वदेखील डोकावतंच. विक्रम यांच्या चित्रांमध्ये एक शांतता आहे, लोभसपणा आहे, तरलता आहे. अवकाश, बिंदू, रेषा, आकार आणि रंग यांच्यामधील सुखसंवाद त्यांच्या चित्रांत अतिशय हळुवारपणे उलगडतो. हा माणूस सहसा कुणाला दुखवत नसावा असं चित्र पाहूनही वाटतं. कारण तीच संवेदनशीलता चित्रात आहे. ते अनेक माध्यमात काम करतात. विशेष म्हणजे अमूर्त शैलीतील चित्रे हा त्यांचा प्रमुख चिंतनविषय असला तरीही त्यांची जलरंगातील निसर्गचित्रेदेखील तितकीच उत्कट आहेत. सदर चित्रात केशरी आणि त्याचा विरोधी रंग निळा हे एकमेकांना इतके पूरक आहेत आणि त्यात लाल रंगाच्या तुकड्याने मध्यस्थी करून संवाद अधिकच रोचक बनविला आहे. पारदर्शकता, रंगलेपन, आकारांचा साधेपणा या गोष्टींनी चित्र आणखीनच वैशिष्टयपूर्ण बनले आहे. आपण विक्रम यांची इतरही चित्रं जरुर पहावीत. 

- श्रीराम हसबनीस

Comments

Popular posts from this blog

Anthe Zacharias

Suchita Tarde