Alice Sheridan.
Artist: Alice Sheridan.
रंग आणि काही ठिकाणी कागदाचे तुकडे वापरून केलेलं हे चित्र एक मधुर असा रंगसंवाद प्रस्थापित करतं. रंगांचे ओघळ हेही चित्राचा महत्त्वाचा घटक बनतात. कोलाजसाठी प्रिंटिंग पेपरचा छान वापर केला आहे. त्याची छिद्रं देखील किती छान वैविध्य आणत आहेत. रंगांचा विचार केला तर उन सावलीचा खेळ भासावा त्याप्रमाणें गडद निळ्या रंगाच्या सोबत हलकासा हिरवट रंग आणि पिवळसर पांढरा रंग छान संवाद साधतो. या रंग संवादाची लज्जत जितकी चित्रं तुम्ही पाहाल तेवढी अधिक वाढत जाईल. ओळखीचे आकार नसूनही चित्र चौकटीत रंग, रेषा, छटा आणि पोत यातून साधणारा एकूण परिणाम हाच या चित्राचा अर्थ. म्हणजेच बरवेंच्या भाषेत "चित्रार्थ".

Comments
Post a Comment