Jackson Pollock
चित्रकार: जॅक्सन पोलॉक (1943)
जॅक्सन पोलोक हा अमेरिकन चित्रकार. त्याच्या नंतरच्या चित्रांपेक्षा हे चित्र खूप वेगळं आहे. निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही रेखांकित आकार दिसतात. त्यापैकी काही आकार पांढऱ्या पिवळ्या, केशरी आणि काळया रंगाने थोडेफार रंगवले आहेत. रंगांच्या तुकड्यांचा हा खेळ काहीतरी गती किंवा ऊर्जा निर्माण करतो. जवळून पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यात काही पर्वत, प्राणी किंवा तत्सम काही काल्पनिक आकारही आहेत. आकारांच्या पलीकडे जाण्याचा विचार करण्याआधी अवकाश आणि आकार यांचं नातं उलगडण्याचा प्रयत्न प्रत्येक अमूर्त वादी चित्रकार करू पाहतो. जॅक्सन पोलॉक याचं हे चित्र अशाच एका वळणावरचं.

Comments
Post a Comment