Paul Klee
Artist: Paul Klee.
गोधडीची वीण दिसावी त्याप्रमाणं पूर्ण चित्रात बारीक बारीक ठिपक्यांच्या एक पोत आहे. शिवाय तपकिरी रेषांचं एक कुंपण आहे एकमेकात गुंफलेलं. त्या रेषांच्या स्पष्ट कुंपणापलिकडे रंगांनी वेगळं होणारं अस्पष्ट कुंपणही आहे. या सगळ्यात खाली एक उभी रेष आहे, जिची दोन्ही टोकं स्वतंत्र आहेत म्हणजे कुठे जोडलेली नाहीत. जसं परिवाराचा भाग असूनही वेगळं असल्याप्रमाणे. डावीकडे एक हिरव्या रंगाची उलटी चंद्रकोर आहे, जी या सगळ्या उष्ण रंग संगतीत उठून दिसते. पण तरीही इतर आकारांवर हावी होत नाही आहे. आता हे सगळं झालं स्थूल वर्णन. चित्रकाराला यातून काय मिळालं असावं? तर अवकाश, रंग, रेषा, आकार आणि पोत यामधून साधला जाणारा एक दृकसंवाद. रचनेचं समाधान. एक सुखावणारी व्हिज्युअल मेलडी.

Comments
Post a Comment