Ravi Mandlik
चित्रकार: रवी मंडलिक.
अमूर्त शैलीत काम करणाऱ्या भारतातील ठळक चित्रकारांपैकी एक. मंडलिक यांच्या चित्रांत वेगवेगळे भाव असतात. त्यांची रंगनिवड देखील वेगवेगळी असते. काही वेळेस तजेलदार रंग, तर काही वेळेस अगदी करडे. त्यांचे आकार आणि अवकाश यांचं एकसंध असणं खूप भावतं. सदर चित्र सायंकालीन अंधुक पणा, एकटेपणा अशा काही अगम्य छटा व्यक्त करतं. आजचा दिवस तर सरला, उद्या नवी पहाट उगवेल अशी काही आशा देखील जाणवते. तोपर्यंतचा काळ मात्र खायला उठतो. अर्थात सर्वांनी चित्र असंच पहावं असं मुळीच नाही. हे केवळ माझं पाहणं झालं. तुम्हाला जे जाणवेल तेही बरोबरच. कारण अशा चित्रांत अगणित भावछटा अंतर्भूत असतात. अमूर्त चित्रं इतर प्रकारच्या चित्रांपेक्षा वेगळी ठरतात ती याच कारणामुळे.

Comments
Post a Comment