Richard Diebenkorn

 



Richard Diebenkorn

1970 नंतर या अमेरिकन चित्रकाराने ओशन पार्क ही चित्रांची मालिका सुरू केली. सुमारे आठ फूट उंच अशी ही चित्रं आहेत. अमूर्त चित्राना विषय नसतो. पण सगुण आणि निर्गुण दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे चित्राला विषय असूनही त्यातलं मर्म मात्र केवलाकारी आहे. ओशन म्हणजे समुद्रकिनारा आणि पार्क म्हणजे त्या किनाऱ्यालगत असणारी बाग. हिरवा आणि निळा अशा दोन रंगांचा प्रातिनिधिक वापर या संपूर्ण चित्र मालिकेत मोठया खुबीने केला आहे. सदर चित्रात समुद्र, आणि बाग यांच्या जोडीला मैदान देखील आहे असं दिसतं. विमानातून पाहिल्याप्रमाणे केवळ बाह्याकार दिसतो. हे सगळं असलं तरी चित्रांमध्ये रेषांचा केलेला नाजूक वापर चित्राची मजा वाढवतो. चित्रातल्या तिरक्या रेषा चित्रात हालचाल किंवा लय आणतात. कारण केवळ आडव्या आणि उभ्या रेषा चित्राला स्तब्ध करणाऱ्या असू शकतात. रंग आपल्याला वरकरणी सपाट वाटत असले तरीही त्यात अगदी हलक्या अशा जवळ जवळच्या छटा जाणीवपूर्वक दिल्या आहेत. चित्राच्या वरच्या बाजूस असणारा पांढरा आणि जांभळा तुकडा चित्राचं गार्निशिंग करतो. खरं पाहता अशी चित्र मूळ स्वरूपात "नजर के सामने" अशी पहायला हवीत. तीच खरी दाद. आपण केवळ एक प्रतिमा पाहत आहोत, प्रत्यक्ष अनुभव हा यापेक्षा खूप वेगळा असतो हे मात्र नक्की. म्हणून मित्रानो, जेव्हा शक्य होईल तेव्हा मूळ चित्रं पहायची संधी कधी सोडू नका. तोच अनुभव तुमच्या लक्षात राहील, प्रतिमा नाही.

Comments

Popular posts from this blog

Anthe Zacharias

Suchita Tarde

Vikram Kulkarni