Deborah Tarr
चित्रकार: Deborah Tarr.
शांत अशा निळ्या रंगांच्या विविध छटांनी गुंफलेलं हे चित्र. दृश्य जगात जसं आपण छायाप्रकाश पाहतो, तसंच काही अमूर्त चित्रांमध्ये छटांच्या योजनेतून आपल्याला छायाप्रकाशाचा आभास होऊ लागतो. एक रचना म्हणून चित्रात गम्मत आणण्यासाठी चित्रकार जवळजवळच्या हलक्याशा छ्टा अशा ठिकाणी ठेवतो की आपली दृष्टी चित्रात खिळून राहते. काही चित्रांत फोकल पॉइंट असतो, तर काही चित्रांत तो नसतो. इथे तो आहे. मध्यभागी असणारे तीन निळे ठिपके आपलं लक्ष वेधून घेतात. इतर छोटे मोठे आकार त्यासाठी सहाय्यभूत ठरतात. एकूणच हे चित्र आल्हाददायक आणि रम्य वाटते.

Comments
Post a Comment