Franz Kline

 


Artist: Franz Kline. 

मी आर्ट कॉलेजमध्ये असताना लायब्ररी मधल्या पुस्तकात अमेरिकन abstract expressionist फ्रांझ क्लाईनची काही चित्रं पाहिली होती. अतिशय वेगवान आणि ताकदवान अशा स्ट्रोक्सनी माझं मन मोहून घेतलं होतं. या माणसाने केवळ काळा आणि पांढरा रंग वापरून ही भल्या मोठ्या आकाराची चित्रं काढली. खरं तर अधिकाधिक चित्रकाराचा ओढा रंगांकडे असतो. फारच थोडे चित्रकार आहेत ज्यांनी आयुष्यात केवळ काळया पांढऱ्या रंगात चित्रं रंगवली. क्लाईनची चित्रं आपल्याला बांधून ठेवतात. स्तब्ध करतात. आकार आणि अवकाश यांचं गहिरं नातं उलगडण्याचा हा प्रवास आपल्याला थक्क करतो. 

- श्रीराम हसबनीस (२२ ऑक्टो. २०२३)

Comments

Popular posts from this blog

Anthe Zacharias

Suchita Tarde

Vikram Kulkarni