Jeane Myers
चित्रकार: Jeane Myers.
या पद्धतीच्या चित्राला आम्ही चित्रकार मंडळी लिमिटेड पॅलेट मध्ये रंगवलेलं चित्र म्हणतो. म्हणजे काय, तर जसं या चित्रात प्रामुख्याने पिवळसर तपकिरी रंग आणि हलकासा निळसर रंग वापरला आहे. म्हणजे रंग दोनच वापरले, परंतु त्यांच्या कितीतरी फिकट ते गडद छटा या चित्रात वापरल्या आहेत. यातून अतिशय सुरेख पोत साधला आहे जो आपलं लक्ष खिळवून ठेवतो. पोत हादेखील चित्राचा महत्त्वाचा भाग असतो. सपाट रंगलेपन करून हा परिणाम साधता आला नसता. असे पोत मिळवण्यासाठी चित्रकार अनेक प्रयोग करीत असतो. कधी नाईफ, कधी रोलर किंवा काहीही. पण त्यामुळे चित्रात एक प्रकारे त्रिमित आभासी वातावरण तयार होते. तुम्हाला या चित्रात काय भावलं हेही मला जाणून घ्यायला आवडेल.

Comments
Post a Comment