Mark Rothko
चित्रकार: MARK ROTHKO (1951)
शीर्षक: क्र.6 (violet, green and red)
अमूर्त शैलीतील अनेक प्रयोग विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. त्यापैकी जगभरात आजही ज्या चित्रकाराच्या चित्रांचा गवगवा होतो ते नाव म्हणजे मार्क रोथको. आकारांशिवाय केवळ रंगांचा वापर करून आपण चित्रांमध्ये काही संवेदना निर्माण करू शकतो का याचा प्रामाणिक प्रयत्न रोथको यांच्या चित्रात दिसतो आणि या प्रयत्नात ते कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. दुसरं असं, की त्यांची चित्र अतिशय मोठ्या आकाराची म्हणजे जवळपास एका भिंतीच्या आकाराएवढी आहेत. त्यामुळे एखादा रंग कोणत्या आकारात तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यानुसार त्या रंगाचा तुमच्यावर होणारा भावनिक परिणाम अवलंबून असतो आणि याचीच अनुभूती रोथको यांच्या चित्रांना डोळ्यासमोर पाहताना रसिकांना आजवर मिळत आली आहे. आणि म्हणूनच आजही रोथको यांच्या चित्रांची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. रोथकोची चित्रं पहायची म्हणजे एक प्रकारे ध्यान क्रियाच म्हणावी लागेल. आपण त्या रंगात एकजीव होतो आणि आपल्याला इतर भान राहत नाही. हीच या चित्रांची यशस्विता.

Comments
Post a Comment