Mashiul Chowdhury
Artist: Mashiul Chowdhury.
हे चित्र पूर्णत: अमूर्त नाही, परंतु एखादे निसर्गचित्र अमूर्ततेकडे कसे झुकते याचा हा एक सुंदर नमुना. पहा ना. इथे टॉवर असलेल्या इमारतीचा आभास अगदी कळेल न कळेल इतकाच ठेवला आहे. आकाश आणि वास्तू स्पष्टपणे एकमेकांपासून वेगळ्या दिसतात. तरीही त्यांच्या कडा कुठेही करकरीत नाहीत. आकारांच्या कडांचे संतुलन हा एक खूप महत्त्वाचा घटक अमूर्त चित्रांत आपल्याला पाहायला मिळतो. छाया प्रकाशाचा आभासदेखील हलकासा आहे. थोडक्यात असं की मूर्त आणि अमूर्त गोष्टी आपल्याला एकमेकांपासून तोडता येत नाहीत. मूर्तात अमूर्त दडलेले असतेच ते पाहणं हाच आनंद.
- श्रीराम हसबनीस (१९ नोव्हे. २०२३)

Comments
Post a Comment