Matthew Dibble
चित्रकार: Matthew Dibble
माध्यम: तैलरंग आकार: २२८.६ सें. मी.(रूंदी) X १९०.५ (लांबी) सें. मी.
हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला कदाचित भेगाळलेली जमीन किंवा भिंतीचे पोपडे आठवतील. या चित्रात कलात्मक काय आहे असाही कदाचित प्रश्न पडेल. कारण तसं म्हटलं तर यात खूप काही आकर्षक रंगही नाहीत. बघितलं तर पांढऱ्या रंगावर काळया रेषा. पण या रेषा एकमेकांशी फेर धरून नाचत आहेत असं नाही का वाटत? त्या रेशांमधील वैविध्य आणि त्यांचं परस्परांशी असणारं नातं खूप आनंददायी आहे. खूप चित्रं पाहिल्यानंतर हळूहळू हे नातं तुम्हाला जाणवू लागेल. या रेषाही तुमच्याशी बोलू लागतील.

Comments
Post a Comment