Prabhakar Kolte
चित्रकार: प्रभाकर कोलते.
भारतातील विद्यमान ज्येष्ठ चित्रकारांपैकी एक नाव, प्रभाकर कोलते. जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये अनेक वर्षे अध्यापक म्हणून त्यांनी योगदान दिलं. दृष्यकला या विषयावरचं त्यांचं लिखाण, व्याख्यान नेहमीच मार्गदर्शक असतं. नुकताच त्यांचा कवितासंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. आता त्यांच्या या चित्राविषयी.
निळ्याशार भिंतीच्या पलीकडले उत्साहाचे उबदार रंग खिडकीतून पाहिल्याप्रमाणे भासतात. त्यांच्या बहुतेक चित्रांमध्ये रंगांच्या मुक्त ओघळामधून चमकणारे कवडसे चित्रात रंगत आणतात. उत्तम रचना असलेल्या त्यांच्या चित्रांत चित्रावकाशातील मोठा भाग सपाट आणि विरोधी छटेत रंगवून इतर नेमक्या जागी तजेलदार रंगांची छान पेरणी केलेली दिसते. त्यांचं हे रचना तंत्र ही त्यांची ओळख बनली आहे. जसे काही गायक हे गायकांचे गायक असतात तोच मान आज कोलते यांना चित्रकारांचे चित्रकार असा दिला जातो.
- श्रीराम हसबनीस

Comments
Post a Comment