Sharad Tarde

 


चित्रकार: शरद तरडे | 12X18 in. | Acrylic on paper | 2019. 

चित्रकार आणि शिल्पकार श्री. शरद तरडे यांची चित्रं अमूर्त कलेबद्दल ओढ निर्माण करण्याची ताकद बाळगून आहेत. विशेष म्हणजे त्यांची चित्रं कधीच एका ठराविक पद्धतीने रंगवलेली नसतात, म्हणूनच ती विशेष असतात. Minimalistic म्हणजेच आपल्याला जे सांगायचं आहे ते थोडक्यात सांगावं असं हे चित्र आहे. संध्या छायेचा तांबूस रंग त्याच्या अनेक केशरी, लाल अशा छटांमधून चित्रभर व्यापून आहे. उभ्या चित्र चौकटीला छेद देणारी आडवी गडद रेषा आपल्याला चित्रात ओढते. ती रेषदेखील काही अस्पष्ट आकार बाळगून आहे. त्यामुळे बघणाऱ्याला त्या रेषेत अनेक आभास होऊ शकतात. क्लिष्ट आकार नसल्यामुळे दर्शक चित्रात, मुख्यत: रंगात रमतो.

Comments

Popular posts from this blog

Anthe Zacharias

Suchita Tarde

Vikram Kulkarni