Wassily Kandinsky
चित्रकार: Wassily Kandinsky.
१९व्या शतकाच्या अखेरीस प्रस्थापित दृश्यकलेच्या निकषाना बाजूला सारून या चित्रकाराने केवलाकारी चित्र परंपरेचा पाया रोवला. आकार आणि नाद यांचा परस्पर संबंध चित्रातून कशा प्रकारे व्यक्त करता येईल याचा त्याने विचार केला. रेषा, गोल, त्रिकोण, आयत अशा मूलभूत भौमितिक आकाराना चित्रावकाशात कशा प्रकारे मांडल्यास त्यातून विशिष्ट संवेदनाची निर्मिती होऊ शकेल याचं दृश्यचिंतन मांडलं. पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा हा प्रवास खूप महत्त्वाचा ठरतो.

Comments
Post a Comment