Jeremy Annear

 


Artist: Jeremy Annear | Palimpsest 2 | 2017 | Oil on primed card | 45 x 22 cm. 

भौमितिक आकारातून साकारलेली ही चित्ररचना रंग आणि पोत यांच्या सहयोगाने खूप उठावदार बनली आहे. चित्राच्या मध्यभागी असणारी जादूच्या छडीसारखी भासणारी आकृती पिवळ्या आणि जांभळ्या रंगामुळे फोकल पॉइंट बनली आहे. चित्रात इतरत्र कुठेच शीतरंग नाही त्यामुळे हा जांभळा रंग मला थोडा खटकला. कदाचित त्या ऐवजी पिवळसर पांढरा रंग देखील संयुक्तिक ठरला असता असं वाटलं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत. चित्राची सुयोग्य फ्रेम चित्राला अधिक उठाव देते हेही आपल्याला इथे लक्षात येईल. 

- श्रीराम हसबनीस

Comments

Popular posts from this blog

Anthe Zacharias

Suchita Tarde

Vikram Kulkarni