Piet Mondrian

 


Artist: Piet Mondrian | Composition with Yellow, Blue and Red (1937-1942) | Oil on canvas | Aquisition- Tate Gallery | 

 नव चित्रकलेचे वारे वाहू लागले त्या काळात म्हणजेच विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पारंपारिक चित्रविषय, चित्रमाध्यम या सगळ्या गोष्टींना बगल देऊन रचनेच्या अगणित सौंदर्य कल्पनांच्या विश्वात विहार करणे अनेक कलाकारांनी स्वीकारले. त्यातूनच निरनिराळे प्रयोग होऊ लागले. त्यातीलच एक प्रयोग आपण इथे पाहतो आहोत. मोंड्रियन या चित्रकाराने केवळ ९० अंशात परस्परांना छेदणाऱ्या काही रेषा, त्यातील काही भाग मोजक्या रंगाने भरून हे चित्र काढले. तुम्हास वाटेल की यात कसब किंवा कौशल्य काय? इथेच आपल्यास कला आणि कौशल्य यांची कलाकृतीत सांगड कशी असते हे पाहावे लागेल. वरकरणी हे सोपे वाटते. परंतु विषम अंग रचना आणि त्यातून साधला गेलेला एकूण आकृतीबंध हेच या चित्राचे वैशिष्ट्य. शिवाय प्रथम असा प्रयोग मांडणाराचे महत्त्वही असतेच नाही का? नंतर त्याची कॉपी करणे सहज शक्य असते, पण प्रथम मांडला गेलेला आविष्कार त्या कलाकाराचे इतिहासातील स्थान अधोरेखित करतो.

Comments

Popular posts from this blog

Anthe Zacharias

Suchita Tarde

Vikram Kulkarni